बीड (रिपोर्टर):- खासबाग ते मोमीनपुरा बंधारा कम पुलाच्या कामा संदर्भात आज आ.संदिप क्षीरसागर यांनी औरंगाबादेत जलसंपदा मंत्री ना.जयंती पाटील यांची भेट घेवून कामाला गती देणे बाबत विनंती केली. पाटील यांनी तात्काळ कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विभाग यांना प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश दिल्याने सदरील कामाला लवकरच सुरूवात होईल. या कामाबाबतचे सर्व अडथळे आता दुर झाल्याने खासबाग ते मोमीनपुरा बंधारा कम पुलाची प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
बीड शहरातील खासबाग ते मोमीनपुरा या भागाला जोडला जाणारा बंधारा कम पुल लवकर व्हावा यासाठी या भागातील नागरिक सातत्याने आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा करायचे, त्याचबरोबर या पुलाबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनीही अनेक वेळा संबंधित मंत्र्यांशी भेट घेवून चर्चा केली. आ.क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे सदरच्या कामाला मान्यता मिळाली होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव प्रशासकीय पातळीवर या कामाची गती मध्यंतरी मंदावली होती. आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे औरंगाबादेत आहेत.

त्यामुळे आ.संदिप क्षीरसागरांनी औरंगाबादेत जावून जलसंपदा मंत्री यांची भेट घेतली. खासबाग ते मोमीनुपरा या भागाला जोडला जाणारा बिंदूसरा नदीवरील बंधारा कम पुलाच्या कामाबाबत गती देण्याची विनंती केली. क्षीरसागरांच्या विनंतीला प्रथम प्राधान्य देत जयंत पाटील यांनी तात्काळ गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता या कामाला गति मिळणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून खासबाग ते मोमीनपुरा या भागाची ही महत्त्वाची मागणी पुर्णत्वाकडे जात असून बिंदूसरा नदी पात्रावर बंधारा कम पुल लवकरच होणार असल्याचे दिसून येते.