नेकनूर (रिपोर्टर):- पायी जाणार्या वृद्धास मोटारसायकलने जोराची धडक दिल्याने यामध्ये सदरील वृद्ध ठार झाल्याची घटना आज दुपारी शिक्षक कॉलनी येथे घडली. रस्ता खोदून ठेवल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
भीमराव काळे (रा. नेकनूर) हे रत्नागिरी ते नेकनूर या रस्त्याने पायी जात होते. पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने त्यांना जोराची धडक दिल्याने यात ते गंभीररित्या जखमी होऊन मृत पावले. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासनू नेकनूर येथील रस्ते खोदून ठेवल्याने वाहन धारकांना वाहने चालवण्यास अनंत अडचणी येतायत. आजचा हा अपघात खराब रस्त्यामुळेच घडल्याचे सांगण्यात आले.
मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध ठार
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.