बीड (रिपोर्टर):- कोव्हिडच्या संसर्गामुळे जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाजुला असलेल्या मुलींच्या वसतीगृहामध्ये तात्पुरते जेल उभारण्यात आले होते. आता सध्या कोव्हिडचा संसर्ग बराच कमी झाल्याने येथील तात्पुर्ते जेल बंद करण्यात आले असून यातील ३३ कैदांना मुख्य कारागृहामध्ये रवाना करण्यात आले. या तात्पुर्त्या कारागृहात आत्तापर्यंत १३०७ कैद्यांना ठेवण्यात आले होते.
कोरोनाचा संसर्ग देशातच नव्हे तर जगामध्ये वाढल्याने बीड येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाजुला असलेल्या मुलींच्या वसतीगृहामध्ये तात्पुर्ते जेल उभारण्यात आले होते. या ठिकाणी नवीन कैद्यांना ठेवले जात होते. मात्र आज स्थितीत कोरोनाचा संसर्ग बर्याच प्रमाणात आटोक्यात आल्याने परिस्थिती पुर्व पदावर येत आहे. त्यामुळे हे तात्पुर्ते जेल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या जेलमध्ये ३३ कैदी होते. या सर्वांना मुख्य कारागृहामध्ये पाठवण्यात आले. आत्तापर्यंत १३०७ कैदी या तात्पुर्त्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या जेलची जबाबदारी स्व.संजय कांबळे, म्हाळसेकर यांच्यावर होती. सदरील तात्पुर्त्या जेलचे काम कारागृह अधिक्षक भोईटे, तुरूंग अधिकारी महादेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चलत होते.
वसतीगृहातील जेल हलवले ३३ कैदी कारागृहामध्ये रवाना
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.