जवाहरनगर पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल
बीड (रिपोर्टर):- औरंगाबाद येथे शिक्षण घेणार्या एका ३० वर्षीय तरूणीला एका महिलेने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सदरील तरूणीने जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
निता गायकवाड ही तरूणी औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. तिला ७७७५९०८९०७, ७७४४८५९७८० या दोन क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. संबंधित महिलेने मी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून निता गायकवाड धमकावले आहे. त्याबरोबर ९४०३०३९०२७ या क्रमांकावरून मॅसेजही पाठवला असून या प्रकरणी तरूणीने औरंगाबाद येथील जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्र्रार दाखल केली. या बाबत तरूणीचा भाऊ सतिष गायकवाड यांनी या बाबतचा जाब धमकी देणार्या महिलेस विचारला असता त्यांना ही आरेरावीची भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्याने सतिष गायकवाड यांनीही या महिलेची तक्रार पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.