Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडराष्ट्रवादी कॉंग्रेसची परिवार संवाद यात्रा

राष्ट्रवादी कॉंग्रेसची परिवार संवाद यात्रा

२० फेब्रुवारीपासून मराठवाड्यात बीडपासून सुरुवात
बीड (रिपोर्टर)- राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून काय अपेक्षा आहेत, पक्षाकडून काय अपेक्षा आहेत, भविष्यात पक्षाने कुठली भूमिका घ्यायला हवी, या सह अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची परिवार संवाद यात्रा मराठवाड्यात डेरेदाख होत असून या संवाद यात्रेची सुरुवात बीड येथून २० फेब्रुवारीपासून होणार आहे.

या परिसंवाद यात्रेत पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते उपस्थित राहणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जावून ते लोकप्रतिनिधींसह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. विदर्भ, कोकण पाठोपाठ २० फेब्रुवारीपासून ते मराठवाडा दौर्‍यावर आहेत. परिवार संवाद यात्रेची सुरुवात बीडपासून होणार असून या संवाद यात्रेत राज्यातील सरकारकडून काय अपेक्षा आहेत, पक्षाने कुठले धोरणे अवलंबवायला हवेत. भविष्यात पक्षाने कुठली भूमिका घ्यायला हवी, आपल्या मतदारसंघात कुठले प्रश्‍न आहेत? ते प्रश्‍न सोडवण्यासाठी तुम्ही काय केले, काय करावे लागेल यासह अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ही संवाद यात्रा २० फेब्रुवारीला बीडमध्ये येत आहे. २१ फेब्रुवारीला शिरूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई आणि तशीच ती पुढे लातूर जिल्ह्यात जाणार आहे. या परिसंवाद यात्रेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी असणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!