Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसनेकनूर स्त्री रुग्णालयाचे केलेे स्टिंग ऑपरेशन वैद्यकीय अधिक्षकांसह सहा डॉक्टर होते गैरहजर

नेकनूर स्त्री रुग्णालयाचे केलेे स्टिंग ऑपरेशन वैद्यकीय अधिक्षकांसह सहा डॉक्टर होते गैरहजर


नेकनूर(रिपोर्टर)ः- नेकनूर स्त्री रुग्णालयाचे आज ग्रा.प.सदस्य आणि काही पत्रकारांनी स्टींग ऑपरेशन केले असता. त्यामध्ये वैद्यकीय अधिक्षकांसह सहा डॉक्टर गैरहजर आढळून आले. एवढे मोठे रुग्णालय आणि त्यात अधिकारी गैरहजर असल्याने हे रुग्णालय फक्त नावालाच आहे की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
आज सकाळी रुग्णालयाची पाहणी ग्रा.प.सदस्य सय्यद साजेद अली, तुळशीराम शिंदे, सय्यद खालेद, शेख इजहार जहागीरदार, पत्रकार अमजद पठाण, शेख रशीद, नौशाद खान यांनी केली. यावेळी वैद्यकीय अधिक्षक शिंदे यांच्यासह सहा डॉक्टर गैरहजर आढळून आले. वैद्यकीय अधिक्षक हे १५-१५ दिवस रुग्णालयाला येत नसल्याचे दिसून आले. हे स्त्री रुग्णालय रुग्णांच्या सुविधेसाठी बांधण्यात आली तरी याठिकाणी डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णालय शोभेसाठी आहे की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!