Friday, May 20, 2022
No menu items!
Homeक्राईमपुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा भाजपा महिला आघाडी आक्रमक

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा भाजपा महिला आघाडी आक्रमक

माजी मंत्र्यासोबतच्या फोटोनंतर आता भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल
बीड/पुणे (रिपोर्टर)- परळी येथील पुजा चव्हाण नावाच्या तरुणीने पुणे येथे आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर या आत्महत्ये प्रकरणी आघाडी सरकारमधील विदर्भातल्या राज्यमंत्र्याचे नाव फोटोमुळे चर्चेत आल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीने या प्रकरणात सखोल चौकशी करण्याबाबतची मागणी केली असून भाजपाच्या राज्यपातळीवरील नेत्यासोबतचे फोटोही आता व्हायरल होत असल्याने या आत्महत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोपाच्या फायरी झडण्याची शक्यता आहे.


मुळची परळी येथील २२ वर्षीय पुजा चव्हाण शिकण्यासाठी पुणे येथील हाडपसर भागामध्ये राहत होती. रविवारी मध्यरात्री एकच्या आसपास तिने सोसायटीया तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा जीव गेला. सदरची घटना ही महम्मदवाडी परिसरातल्या हेमंत पार्कमध्ये घडली. आत्महत्येच्या दुसर्‍याच दिवशी तिचा मित्रासह विदर्भातील एका मंत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. उलटसुलट चर्चेला उधान आले. त्यानंतर आज पुणे येथील भाजपा महिला आघाडीच्या अर्चना पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतची मागणी पुणे पोलिसांकडे केली आहे तर दुसरीकडे पुजा चव्हाण हिचा राज्यपातळीवरील भाजपाच्या नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल होत असल्याने चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोपाच्या फायरी आता झडल्या जाण्याची शक्यता आहे.
भातखळकर यांनी घेतले मंत्र्याचे नाव
नागपूर : पुण्यातील पुजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यात विदर्भातील एका मंत्र्याचे नाव चर्चेत होते. त्यावरून आता भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांच्या प्रकरणातील दबंगगिरी सहन केली. त्यावर ते शांत बसले. आता ते आपल्याच पक्षातील मंत्र्याच्या प्रकरणातील ’राठोडगिरी’ सहन करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ’राठोडगिरी’ हा शब्दाचा उल्लेख करून त्यांनी सेनेच्या एका मंत्र्यावर थेट निशाणा साधला.

Most Popular

error: Content is protected !!