बीड/ माजलगांव (रिपोर्टर)ः- केंद्र सरकारने कृषीचे तिन विधेयक आणले. हे विधेयक रद्द करण्यासाठी गेल्या अडिच महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहे. या शेतकर्यांना समर्थन देण्यासाठी व कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आनंदगांव ते माजलगांव बैलगाडी रॅली काढण्यात आली होती.

केंद्र सरकारने काही महिन्यापूर्वी कृषीचे तिन विधेयक आणले. हे विधेयक शेतकर्यांना उध्दवस्त करणारे आहे. कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी गेल्या अडिच महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलन कर्त्यांची केंद्र सरकारकडून अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याने केंद्राच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कृषी कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी आणि आंदोलन करणार्या शेतकर्यांना समर्थन देण्यासाठी आज शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आनंद गाव ते माजलगांव बैलगाडी रॅली काढण्यात आली होती.या रॅलीमध्ये अनेक शेतकर्यांचा सहभाग होता.या रॅलीने माजलगांव दणाणून गेले होते.