बीड (रिपोर्टर):- कोरोना रूग्णांचा आकडा कमी होवू लागला असल्याने आज आलेल्या ४३० अहवालामध्ये बीड शहरात केवळ १ रूग्ण आढळून आला असून तालुक्यात ३ जण बाधीत तर जिल्ह्यात १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आरोग्य विभागाला आज दि.१२ फेब्रवारी रोजी काल पाठवलेल्या ४३० अहवालांचा रिपोर्ट प्राप्त झाला असून यामध्ये ४१४ जण निगेटीव्ह आढळून आले आहे. १६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये अंबाजोगाईच्या आष्टी ४, बीड ३, गेवराई १, केज १, माजलगाव २ आणि परळी तालुक्यात १ रूग्ण आढळून आला आहे.