Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपरळीऔष्णीक विद्युत केंद्राच्या राखेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात दादाहरी वडगावचे नागरिक उतरले रस्त्यावर

औष्णीक विद्युत केंद्राच्या राखेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात दादाहरी वडगावचे नागरिक उतरले रस्त्यावर

राखेमुळे पिकांचे प्रचंड नुकसान नुकसान भरपाई देण्याची मागणी
परळी (रिपोर्टर)- परळी औष्णीक विद्युत केंद्राच्या राखेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम तर होतच आहे मात्र परिसरातील पिकेही उद्ध्वस्त होत असल्याने शासनाने उद्ध्वस्त झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी दादाहरी वडगाव येथील नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये तेथील नागरिकांसह महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आँदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परळी औष्णीक विद्युत केंद्रामधून जी राख निघते त्या राखेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. राखेमुळे जमीनीचा पोत खराब होऊ लागलाय. त्याचबरोबर पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यायला हवी, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. आज दादाहरी वडगाव येथील नागरिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात हरीष नागरगोजे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला आणि लहान मुलेही या आंदोलनात उतरले होते.

Most Popular

error: Content is protected !!