Friday, May 20, 2022
No menu items!
Homeक्राईममाझी बहीण वाघीन होती, ती असं करू शकत नाही पुजाच्या बहिणीची इंस्टाग्रामवर...

माझी बहीण वाघीन होती, ती असं करू शकत नाही पुजाच्या बहिणीची इंस्टाग्रामवर पोस्ट


बीड (रिपोर्टर)-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये अद्याप तिच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पूजाची लहानी बहीण दिया चव्हाणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात पूजाने तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असं म्हटलं आहे. दियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट असली तरी ती पोस्ट तिनेच टाकली का? याबाबत पडताळणीसाठी तिच्याशी किंवा तिच्या कुटुंबाशी अद्याप कुठलाही संपर्क झाला नाही.

pooja chawan


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र यानंतरही कुटुंबातला कुठलाही व्यक्ती या प्रकरणावर बोलायला तयार नव्हता. आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं असून कालपर्यंत तिच्या घरातून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त होत नव्हत्या. परंतु पूजाची छोटी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती, ती असं करु शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!