Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमकंटेनरने नऊ वर्षीय मुलीला चिरडले

कंटेनरने नऊ वर्षीय मुलीला चिरडले

राष्ट्रवादी भवन समोर घडली घटना, आजोबा सोबत नात जात होती वायभटवाडीला
बीड (रिपोर्टर)ः- वायभटवाडीकडे जाणार्‍या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेली नऊ वर्षीय मुलगी कंटनेरच्या पाठीमागील टायरखाली पडली. टायर मुलीच्या शरिरावरुन गेल्याने ती जागीच ठार झाली. ही दुर्देवी घटना आज सकाळी बार्शीरोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. कंटेनर चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले.


उध्दव भानूदास चंदनशिव रा.मित्रनगर हे आजसकाळी आपल्या दुचाकीवर वायभटवाडीकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची नऊ वर्षीय नात किमया अमर देशमुख ही होती. राष्ट्रवादी भवनासमोर त्यांच्या दुचाकीला इंदौरहून बीडकडे येणारा कंटेनर क्र. एम.एच.१२.ओ.८१४३ ने धडक दिली. यामध्ये पाठीमागे बसलेली किमया देशमुख ही कंटेनरच्या पाठीमागील टायर खाली आली. त्यात ती जागीच ठार झाली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून घटनास्थळी पोलीसांनी येवून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.दरम्यान किमया देशमुख ही औरंगाबाद येथील असून ती काही दिवसापूर्वी आपल्या आजोबाकडे आलेली होती. किमयाचे आई-वडिल येथे डॉक्टर असल्याचे सांगण्यात येते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!