Saturday, March 6, 2021
No menu items!
Home बीड गेवराई ताजी बातमी -वीज पुरवठा सुरुळीत करा म्हणत आ.लक्ष्मण पवारांनी महावितरण...

ताजी बातमी -वीज पुरवठा सुरुळीत करा म्हणत आ.लक्ष्मण पवारांनी महावितरण कार्यालयासमोरच सुरू केले आमरण उपोषण

तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही – आ.लक्ष्मण पवार

गेवराई (भागवत जाधव) रब्बी हंगामातील पिके ऐन भरात असतानाच, आघाडी सरकारच्या विद्युत विभागाने कोणतीच पूर्व सूचना न देताच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना आ.लक्ष्मण पवार यांनी आज दुपारी याबाबत महावितरण कार्यालयाचे येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत पूर्व सूचना न देता खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करा अशी विनंती केली मात्र प्रशासनाने अडमुठे धोरण ठेवून याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आ.लक्ष्मण पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महावितरण कार्यालयाच्या दारातच ठिय्या मांडत आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान आ.पवार यांनी विज बिलाचे पैसै भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन, केवळ आम्हाला दहा दिवस मुदत द्या, अशी मागणी केली. मात्र, मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आठमुठे पणा करत प्रतिसाद दिला नाही.
आघाडी सरकार हे फक्त भाजपा पक्षाच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली करत असल्याचा गंभीर आरोप आ. पवार यांनी केला आहे. तर आ. लक्ष्मण पवार यांनी उपोषण सुरू करताच चार दिवसापूर्वी बंद केलेले गावठाण फिड्डर महावितरण विभागाने सुरू केले आहे. मात्र जो पर्यंत शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत आपण विद्युत कंपनीच्या कार्यालय परिसरातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेत येथील आ.लक्ष्मण पवार यांनी घेतली आहे.
यावेळी जि.प.सदस्य पांडुरंग थडके, सभापती दीपक सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षभुवनकर, पं. स.सदस्य जगन आडागळे नगरसेवक राहुल खंडागळे, ऍड.भगवान घुंबार्डे, भरत गायकवाड, अजित कानगुडे,जानमोहमद बागवान, समाधान मस्के,भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, करण जाधव, बाळासाहेब गायकवाड, पुरुषोत्तम दाभाडे, शेख बदुयोद्दीन, शेतकरी नेते नानासाहेब पवार, हिरापूरचे सरपंच अमोल तिपाले, सरपंच शिवाजीराव शिंगाडे, कैलास पवार, शेख मोहंमद, हिरापूरचे संतोष मुंजाळ, नितीन शेटे,रामप्रसाद आहेर, ब्रम्हदेव धुरंधरे, विठ्ठल मोटे, सुंदर धस, विनोद निकम, मातीन कुरेशी, गणेश मुंडे, मंजूर बागवान, सय्यद युनूस, शेख अब्दूलभाई, अशोक गोरे, शेतकरी रामराव मोहळकर, कृष्णा संत, प्रकाश शिंदे,हरीश वडघणे, सुरेश डाके, विनोद आहेर,रामनाथ महाडिक,उद्धव साबळे, प्रकाश गाडे, कृष्णा राठोड यांच्यासह सर्व नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान तालुक्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आ.लक्ष्मण पवार यांनी घेतला आहे. तर उद्या तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलनाचा ईशारा ही त्यांनी दिला आहे.

Most Popular

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...