Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईम‘पाहिजे’ ‘फरार’ आरोपींसाठी विशेष मोहीम पहिल्या दिवशी २१ आरोपी ताब्यात

‘पाहिजे’ ‘फरार’ आरोपींसाठी विशेष मोहीम पहिल्या दिवशी २१ आरोपी ताब्यात

बीड (रिपोर्टर)- विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी बीड जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेतला होता. त्यामध्ये बीड जिल्ह्यात विविध खून, दरोडे, बलात्कार यासह अन्य गुन्ह्यातील अनेक आरोपी फरार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांनी ते आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची सूचना बीड पोलिसांना दिली होती. कालपासून ही मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून पहिल्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने १७ तर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी ४ असे एकूण २१ आरोपी पकडण्यात आले.


विशेष पोलिस महानिरीक्षकांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्ह्यातील फरारी आरोपींची संख्या मोठी असल्याने त्यांना तात्काळ पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये पाहिजे आरोपी १०५४, फरार व स्टँडींग वॉरंटमधील ११९ यासह इतर गुन्ह्यातील ८२ असे आरोपी फरार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कालपासून पाहिजेत फरार आरोपींविरोधात मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एलसीबीने १७ आरोपी पकडले तर अंमळनेर पोलिसांनी १ तर धारूर पोलिसांनी ३ असे २१ आरोपी पकडण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!