नेकनूर (रिपोर्टर)ः- घरी कोणी नाही याची संधी साधून अज्ञात चोरटयांने एका घराचे कुलूप तोडून आतील नगदी १ लाख ३९ हजार व सोन्या चांदीचे दागीने असा एकुण २ लाख ९० हजार रुपयाचा एैवज लंपास केला.
भागवत दिनकर सिरसट रा. कळसंबर वडगांव हे काल नेकनूर येथे बाजाराला गेले होते. त्यांच्या घरी इतर सदस्यही नव्हते. घरी कोणी नाही याची संधी अज्ञात चोरट्याने उचलली. त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतील नगदी १ लाख ३९ हजार व इतर सोन्याचे दागीने असा एकु २ लाख ९० हजार रुपयाचा ऐैवज चोरुन नेला. घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निर्देशनास आले.या प्रकरणी सिरसट यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणत आला. या प्रकरणाचा अधिक तपास काळे हे करत आहे.