Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडभाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या विरोधात परळी पोलीसात तक्रार

भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या विरोधात परळी पोलीसात तक्रार


परळी (रिपोर्टर):- बंजारा समाजाविषयी जातीवाचक आपमानास्पद शब्दप्रयोग केल्याने बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजाची बदनामी झाली आहे असं म्हणत शेकडो बंजारा समाजाच्या नागरिकांनी आज परळी शहर पोलीसात भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या विरोधात तक्रार दिली असून भातकळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या तक्रारी अर्जात केली आहे.
मुळची परळी तालुक्यातील पुजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात भाष्य करतांना विविध प्रसिद्धी माध्यमांवर भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी बंजारा समाजाविषयी आपमानजनक वक्तव्य केले. समाजाच्या भावना दुखवणारे शब्दप्रयोग करून राठोडगिरी म्हणत समाजाची बदनामी होईल असे जातीवाचक शब्द उद्गारून समाजाची बदनामी केली. त्यांच्या या वक्तव्याने आमच्या भावना दुखावल्या असून अतुल भातखळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी बाळासाहेब चव्हाण, विजय राठोड, प्रकाश चव्हाण, डि.एम.राठोड, कुंडलीक राठोड, विकास पवार, नरेश राठोड, करण पवार, पंडीत जाधव, रविराज राठोड, चव्हाण वैजनाथ, नितीन राठोड, जाधव एम.डी., नरेंद्र राठोड, अमोल चव्हाण, विशाल जाधव, रमेश रंगनाथ, अजय राठोड, अविनाश चव्हाण, केशव राठोड, सचिन राठोड, संग्राम राठोड, भारत राठोड, रवि चव्हाण, आकाश राठोड, जाधव अनिल यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!