मरणाचं कारण समोर आलं नव्हतं
केज (रिपोर्टर)ः- माळेगांव शिवारातील गव्हाच्या पिकामध्ये तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती युसूफवडगांव पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.सदरील हा मयत कळंब येथील आहे. तो इकडे कसा आला आणि त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे.
कळंब रोडवर असलेल्या माळेगांव शिवारातील गव्हाच्या शेतामध्ये तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती तुकाराम गुंटाळ यांनी युसूफवडगांव पोलीसांना दिली. त्यानुसार पि.आय.पालवे, कोल्हे, ढाकणे, खानपट्टे यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. सदरील हा मयत लखन सुदाम सोनवणे रा.कळंब येथील असल्याचे निष्पन्न झाले असून या तरुणाचा मृत्यु नेमका कशामुळे झाला. हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर येवू शकते. या प्रकरणाचा अधिक तपास युसूफवडगांवचे पोलीस करत आहेत.