Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeबीडमहागाईने त्रस्त जनता ‘गॅस’वर मध्यरात्रीपासून सिलिंडर पन्नास रूपयांनी महाग

महागाईने त्रस्त जनता ‘गॅस’वर मध्यरात्रीपासून सिलिंडर पन्नास रूपयांनी महाग


मुंबई (रिपोर्टर): देशभरात पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने वाहनधारकांच्या खर्चात प्रचंड वाढ केलेली असताना आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणार आहे. आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) घरगुती वापराचा गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता.


करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) मुंबईत गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये ५० रुपयांची वाढ होणार आहे. सध्या १४ किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत ७१९ रुपये आहे. त्यात मध्यरात्रीपासून ५० रुपयांची वाढ होणार आहे. एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी सिलिंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

गॅस सिलिंडरच्या किमतीत डिसेंबरपासून वाढ होतआहे. १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १६ फेब्रुवारीपासून सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!