Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमजीपची मोटरसायकलला धडक,दोन तरुण ठार

जीपची मोटरसायकलला धडक,दोन तरुण ठार

अंबाजोगाई येथे लग्नाला जात होते तरूण
धायगुडा पिंपळाजवळ शिवशाही पलटली
केज/अंबाजोगाई (रिपोर्टर)ः- भरधाव वेगात निघालेल्या कु्रझर गाडीने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता होळ जवळ घडली. या प्रकरणी कु्रझर चालका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या धायगुडा पिंपळा लगत असलेल्या टिव्ही सेंटरजवळ एसटी महामंडळाची बस पलटी झाल्याने तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
अजिंक्य दत्ता धस, वय २० वर्षे, महेंद्र भिमराव घुगे वय२० वर्षे, रा.दोघे होळ ता.केज.हे मोटार सायकल क्र. एम.एच.४४ व्ही. २१८९ यावर लग्नासाठी अंबाजोगाईकडे जात होते. केज-अंबाजोगाई रोडवर होळजवळ या तरुणांच्या मोटार सायकलला समोरुन येणारी कु्रझर गाडी एम.एच.२४ व्ही.४४८९ ने जोराची धडक दिली. यात अजिंक्य धस हा तरुण जागीच ठार झाला. तर महेंद्र घुगे याला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेवून जात असतांना रस्त्यामध्ये त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती युसूफवडगांव पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या प्रकरणी जिप चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी अपघाताची घटना अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या धायगुडा पिंपळा जवळील टिव्ही सेंटर जवळ घडली. एसटी महामंडळाची शिवशाही ही बस क्र.एम.एच.०६ बीडब्ल्यु ४३८१ पलटी झाल्याने या अपघातात तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. सदरील बसमध्ये पंधरा प्रवाशी होते असे सांगण्यात येते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!