गेवराई
गेवराई हून शहागड कडे भरधाव वेगाने निघालेल्या महिंद्रा कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने सदरील कार राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उभ्या खांब्यावर जाऊन जोराची धडकल्याने झालेल्या अपघातात वाहान चालक व अन्य एकजण जखमी झाल्याची घटना सोमवार दि.15 रोजी सकाळी सहाच्या सुमारास धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बागपिंपळगाव गावा जवळ घडली. या बाबत अधिक माहिती अशी की, हे नागपुर येथील अंजिक्य डोंगरे व विवेक व अन्य काहीजण महिंद्रा कार क्रमांक एम.एच.49 बी.बी. 6061 या कारणे गेवराई हुन शहागड कडे भरधाव वेगाने निघाले होते. त्यांची गाडी धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बागपिंपळगाव या गावा जवळ येताच चालकाचा कार वरील ताबा सुटला व सदरील कार ही राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभ्या खांब्याला जाऊन धडकून राष्ट्रीय महामार्गा लगट असलेल्या खड्यात अडकली. सदरील घटना बागपिंपळगाव गावातील नागरिकांना माहित होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना गाडीतून बाहेर काढून पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात हालविले या झालेल्या अपघात अजिंक्य डोंगरे व विवेक दोघेजण किरकोळ जखमी झाले होते.