Monday, March 8, 2021
No menu items!
Home बीड बीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रारूप आराखड्यात ९७.१७ कोटी रुपये वाढ– धनंजय मुंडेंची मागणी...

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रारूप आराखड्यात ९७.१७ कोटी रुपये वाढ– धनंजय मुंडेंची मागणी अजितदादांनी केली मान्य!

धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर अजितदादांनी बीड जिल्हयाला भरभरून दिले

जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण )सन २०२१-२२ साठी ३४० कोटीच्या आराखड्यास राज्यस्तरीय नियोजन समितीची मंजुरी

बीड, दि. १५ :
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत बीड जिल्ह्यासाठी २४२ कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज औरंगाबाद मध्ये झालेल्या बैठकीत ९७.१७ कोटी रुपयांनी वाढ करून सर्वसाधारण योजनेसाठी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ३४० कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

inbound8103483683924632531

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षाच्या जिल्हा नियोजन प्रारुप आराखड्यास मंजूरी दिली; जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार वाढीव निधी दिल्याचे ना. अजितदादा पवार म्हणाले.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आजच्या राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीस राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, वित्त व नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्याताई शिरसाट, आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षिरसागर, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अपर्णा गुरव, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्याचा विकासासाठी निधीची गरज ध्यानात घेता गाव रस्ते, अंगणवाड्या, आरोग्य सुविधा व शिक्षण यासाठी हा निधी वापरला जावा असे सांगून ते म्हणाले गावातील रस्त्यांसाठी निधीचा वापर करताना पहिल्या वर्षी खडीकरण करून रस्ते तयार केले जावेत व दोन वर्षानंतर डांबरीकरण करणे शक्य होईल जिल्ह्यातील गावांमधील रस्त्यांचा प्रश्न यामुळे सुटू शकेल व निधीची उणीवही भासणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी जिल्ह्यातील विकासाच्या विविध कामांसाठी निधीची कमतरता भासत असून यावर्षी राज्य शासनाने मंजूर केलेला नियतव्यय हा मागच्या पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यास भरीव निधी वाढवावे अशी मागणी केली.

यावेळी आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर आणि आ. विक्रम काळे, आ दोंड यांनी बीड जिल्ह्यातील विकासासाठी विविध मागण्या मांडल्या. जिल्हाधिकारी श्री जगताप यांनी प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. तर जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानले.

याप्रसंगी बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी असलेली कृषी पंप थकबाकी पंधरा हजार कोटी पर्यंत पोहोचली असून यापैकी दोन तृतीयांश रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे, बीड जिल्ह्याच्या 2 हजार 228 कोटी रुपये थकबाकी पैकी जवळपास पंधराशे कोटी माफ करण्यात आले आहेत. जे तालुके विज थकबाकी भरतील त्यांना महावितरणमधून पुढील विकासाचा निधी देता येईल अशी सूचना करण्यात आली. तसेच केलेली मागणी विचारात घेता माजलगाव येथील नाट्य गृहासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली असून जिल्हा नियोजन मार्फत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले.

ग्रामीण भागात पाणंद रस्ते, मनरेगा मधील कामे यावर भर देऊन केंद्र सरकारच्या निधीचा जास्तीत जास्त वापर करावा अशा सूचना यावेळी अर्थमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

हॉटेल चालकाला मारहाण शिवाजीनगर ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर):- विशाल अशोक गवळी (वय ३२) यांचे चर्‍हाटा रोडवरील आगलावे इस्टेट येथे चहाचे हॉटेल आहे. तेथे एकनाथ कदम व इतर दोघे...