Friday, May 20, 2022
No menu items!
Homeशेतीशंतनू शेतकर्‍याचा पोर, आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून गुन्हा, केंद्र सरकार विरोधात सर्वसामान्यात...

शंतनू शेतकर्‍याचा पोर, आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून गुन्हा, केंद्र सरकार विरोधात सर्वसामान्यात संताप

शंतनूच्या अटकपुर्व
जामीनीवर आज सुनावणी

बीड/औरंगाबाद (रिपोर्टर)- दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील टूल किट प्रकरणी बीडच्या शंतनू मुळूक या विद्यार्थ्यावर दिल्ली पोलिसांनी अटक वॉरंट काढून घराची तपासणी केल्यानंतर आज शंतनूच्या ट्रायझिक अटकपुर्व जामीन अर्जावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. शंतनू मुळूक हा शेतकर्‍याचा मुलगा असून त्याने शेतकर्‍यांचं आंदोलन जागतिक पातळीवर नेले, त्याच द्वेषभावनेतून केंद्र सरकारने त्याच्यावर गुन्हा दाखल केला, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.


केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे केल्यानंतर हे कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकर्‍यांचं हे आंदोलन चिरडण्यासाठी अनेक वेळा सरकारकडून ोतकर्‍यांना आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. भाजपाच्या काही नेत्यांनी आंदोलनात खलिस्तानवादी, नक्षलवादी, पाकिस्तीन, अतिरेकी असल्याचे वक्तव्य केले. आंदोलन मार्गावर बॅरिकेट, जाळ्या एवढेच नव्हे तर पोलिसांनी खिळे रोवले तरीही आंदोलक मागे हटत नाहीत. हे आंदोलन जागतिक स्तरावर गेलं. सर्वस्तरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत गेला. सोशल मीडियावर आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक जण उभे राहिले. यातूनच वादग्रस्त टूलकिट प्रकरण जन्माला आले. या टूलकिट प्रकरणी दिशा रवी या पर्यावरणवादी विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल होऊन तिला अटक झाल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनु शिवलाल मुळूक यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी अटक वॉरंट काढले. काल बीडमधील शंतनू मुळुकच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांनी झाडाझडती घेतली. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शंतनूच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शंतनूवर भा.दं.वि. १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या जामीनीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. शंतनूने केवळ शेतकर्‍यांचे आंदोलन जागतिक पातळीवर नेल्याचा राग केंद्र सरकारला आहे त्यामुळेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला , अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!