Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडटूलकिट प्रकरण: शंतनू मुळूक यांना जामीन मंजूर, निकिता जेकब यांच्या याचिकेवर उद्या...

टूलकिट प्रकरण: शंतनू मुळूक यांना जामीन मंजूर, निकिता जेकब यांच्या याचिकेवर उद्या निर्णय

टूलकिट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शंतनू मुळूक यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, तर निकिता जेकब यांच्या याचिकेवर उद्या निर्णय देण्यात येईल. वकिल आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यांच्या ट्रानसीट जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.

https://beedreporter.com/news/3124/

दिल्ली पोलिसांना अटकेची कारवाई करता येऊ नये, यासाठी निकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. टूलकिट डॉक्युमेंट प्रकरणात निकिता जेकब एक संपादक आहेत.

याच प्रकरणात दिशा रवी अटकेत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचवेळी शंतनू मुळूक यांना दिलासा दिला. त्यांचा ट्रानसीट जामीन अर्ज मंजूर केला. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी निकिता जेकब यांनी याचिका दाखल केली आहे. निकिता जेकब या मुंबई उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम करतात. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरुन सोमवारी दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले.

निकिता जेकब यांच्या घराती झडती घेण्यासाठी ११ फेब्रुवारीला पोलिसांची टीम त्यांच्या घरी गेली होती, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील सूत्रांनी सांगितले. संध्याकाळच्या सुमारास ही टीम निकिता जेकब यांच्या घरी पोहोचली, त्यावेळी त्यांनी निकिता जेकब यांची कुठलीही चौकशी केली नाही.

Most Popular

error: Content is protected !!