वडवणी (रिपोर्टर):-
बिचकुलदरा तांड्यातील एक २६ वर्षीय ऊसतोड मजुर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच गढी कारखान्यावर ऊस तोडत होता.चार महीने ऊसतोड करुन तो कुटुंबासह घरी परतत असताना आज दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव पिंपळनेर बीड रस्त्यावरील मुगगाव – पाटेगाव शिवारात शिवरस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली पडुन त्याचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे वडवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वडवणी तालुक्यातील ऊस तोड मजूर गाव,घर व नातेवाईक सोडून हजारो कुटुंब ऊस तोडणी साठी पश्चिम महाराष्ट्र तसेच परराज्यात जातात. कशाची एक कुटुंब कर्नाटकामध्ये ऊसतोडीसाठी गेले.त्याठिकाणचा ऊस संपल्यामुळे गेवराई तालुक्यातील जय भवानी साखर कारखाना गढी या ठिकाणी ऊसतोडीसाठी आले होते.आज ऊसतोडीचे काम संपवुन घरी परतत असतानाच काळाने त्या कुटुंबाच्या कर्त्या माणसावर काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं.