Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeदेश विदेशशंतनू पाठोपाठ निकिताला जामीन

शंतनू पाठोपाठ निकिताला जामीन

दिल्ली (वृत्तसेवा): पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणातील संशयित ऍड निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी निकिता यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.


टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी अटक केली. त्यानंतर ऍड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर दिल्ली पोलीस अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.समाजमाध्यमावरून ते प्रसारित केले, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्‌यावर घडलेला प्रकार हा एकप्रकारे हत्याकांडच होते. त्यात ४०० हून अधिक पोलीस जखमी झाले, असा आरोप करून दिल्ली पोलिसांनी जेकब यांची याचिका फेटाळण्याची मागणी काल झालेल्या सुनावणी दरम्यान केली होती.
सुप्रिम कोर्टाकडून दिलासा
टूलकिट प्रकरण!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!