Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीडमध्ये कोरोना चाचण्या अत्यल्प केवळ २०३ जणांच्या तपासणीत २८ पॉझिटिव्ह

बीडमध्ये कोरोना चाचण्या अत्यल्प केवळ २०३ जणांच्या तपासणीत २८ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- राज्यभरातील काही शहरात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा शासन-प्रशासन व्यवस्थेसह सर्वसामान्यांची चिंता वाढली असून जास्तीत जास्त कोरोना तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली असतानाच काल केवळ २०३ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मराठवाड्याचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बीड, हिंगोली जिल्ह्यात कोरोना तपासण्या कमी होत असल्याबाबत काल जिल्हाधिकारी, एसपी, सीईओ यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत खंत व्यक्त केल्यानंतर बीडमध्ये काल केवळ २०३ संशयितांच्या तपासण्या झाल्याचे अहवालातून दिसून येते. यामध्ये २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाबाबत म्हणावी तेवढी काळजी घेतली जात नसून विना मास्क फिरणारे आणि गर्दी वाढवणारे अनेक कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसू नयेत आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त कोरोना तपासण्या व्हायला हव्यात परंतु त्या होत नसल्याचे आयुक्त केंद्रेकरांनीच बोलून दाखविले आहे. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १५, बीड ४, केज १, माजलगाव ३, परळी ५ तर शिरूर तालुक्यातही एक रुग्ण आढळून आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!