Friday, March 5, 2021
No menu items!
Home कोरोना कोरोना ऍक्टिव्हेट, मराठवाड्याचं प्रशासन दक्ष

कोरोना ऍक्टिव्हेट, मराठवाड्याचं प्रशासन दक्ष


सुनिल केंद्रेकरांनी घेतली कलेक्टर, एसपी, सीईओंची बैठक
त्या व्हिडिओ कॉन्फरन्सची ऑडीओ क्लिप व्हायरल
मास्क न लावणारे, गर्दी करणार्‍या मंगल
कार्यालय, कोचिंग क्लासेसवर छापे मारा
खासगी डॉक्टरांना फ्ल्यू, कोरोना सदृश्य पेशंट
आल्यास कोरोना टेस्टची सक्ती करण्याच्या सूचना द्या,
आपआपल्या जिल्ह्यात कोरोना टेस्ट वाढवा,
व्हेंटीलेटर व्यवस्थीत आहेत का बघा,
बीड-हिंगोलीत टेस्ट कमी होत असल्याची खंत

बीड (रिपोर्टर)- कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आता दक्षता घ्या, सर्व मंगल कार्यालयांवर छापे मारा, जे नियमांचे पालन करत नसतील त्यांच्यावर कारवाई करा, कोचिंग क्लासेसला नोटीसा द्या, मास्क नसतील, सॅनिटायझर नसेल, सांगूनही ऐकत नसतील तर थेट कारवाई करा, सर्व खासगी डॉक्टरांना त्यांच्याकडे आलेल्या फ्ल्यू पेशंटची कोरोना टेस्ट झाली पाहिजे याबाबत सूचित करा, बेशिस्तपणा असाच वाढला तर पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल हे आपआपल्या जिल्ह्यातल नागरिकांना माध्यमांमार्फत प्रेस घेऊन सांगा, कोरोना टेस्ट मोठ्या प्रमाणावर वाढवा, अशा आशयाच्या सूचना आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, सीईओ यांना व्हिसीद्वारे दिले असून त्याबाबतची ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

covid 19

प्रशासकीय पातळीवर कोरोना गंभीर असून लोकांनी मात्र कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचे आजचे चित्र आहे.
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी रात्री मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, सीईओ यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्याची ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये केंद्रेकर कोरोनाबाबत सूचना देत आहेत. मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस यांच्यावर छापे मारा, त्यांना नोटीसा द्या, शासनाने नियम घालून दिलेला पाळीत नसतील तर दंडात्माक कारवाई करा, पुन्हा सापडले तर गुन्हा दाखल करा, कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकानदार, भाजीपाला विकणारे, फेरीवाले यांच्या कोरोना टेस्ट करा, ज्या भागात कोरोनाचे पेशंट सापडत असतील तो भाग नाही तर बिल्डींग तरी सील करा, म्हणजे कोरोना बाधीत बाहेर फिरणार नाहीत. खासगी डॉक्टरांना लिखित स्वरुपात सूचना द्या, फ्ल्यू अथवा कोरोना सदृश्य रुग्ण त्यांच्याकडे आला तर त्याला कोरोना टेस्ट बंधनकारक करा, पत्रकार परिषद घेऊन लोकांना मास्क वापरण्याची, गर्दी न करण्याची सूचना द्या, ज्या भागात लोक ऐकत नसतील त्या भागात मास्कसाठी दंडात्मक कारवाई करा, कोरोना पुन्हा वाढणार आहे हे लोकांपर्यंत जाऊन सांगा, बेशिस्तपणा वाढतच असेल तर लॉकडाऊन पुन्हा लावावा लागेल हे स्पष्ट सांगा, रुग्णालयात व्हेंटीलेटर आहेत की नाही यासह अन्य बाबी तपासून घ्या, कोरोना तपासण्या जास्तीत जास्त करा. बीड आणि हिंगोलीमध्ये कोरोना टेस्ट कमी प्रमाणात होत आहेत तिथे टेस्ट वाढवा, अशा सूचना देणारी ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून कोरोना पुन्हा वाढत असल्याचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सवरून दिसून येत आहे.

Most Popular

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे दार उघडले

आज चौघांचा तर तिन दिवसात सात बाधितांचा मृत्यूबीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसून येत असून रोज कोरोना बाधीत...

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

बीड (रिपोर्टर)- काल नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे गंठण लंपास...

तेल खावे की नाही? खाद्य तेल पावणे दोनशावर गेले

बीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दोन दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत सापडले असतांना खाद्य तेलाचे भावही गगनाला...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...