बीड (रिपोर्टर)- कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. काल 446 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये 409 रुग्ण निगेटिव्ह तर 37 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उपचार घेत असलेल्या 23 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.