Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडआंदोलनकर्ते शिक्षकांना अटक, सर्व शिक्षक संघटनाकडून शालेय शिक्षण मंत्र्यांचा तिव्र निषेध

आंदोलनकर्ते शिक्षकांना अटक, सर्व शिक्षक संघटनाकडून शालेय शिक्षण मंत्र्यांचा तिव्र निषेध


ीड (रिपोर्टर)ः- तब्बल 20 दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर विना अनूदानीत शिक्षकांना पगार मिळावा यासाठी शिक्षक संघटनांचे धरणे आंदोलन सुरू आहे. काल या शिक्षक संघटनांनी 20 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नाही म्हणून शालेय शिक्षण मंत्री यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरू केले असता शिक्षण मंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्याऐवजी मुस्कटदाबी करत या शिक्षकांना अटक केली आहे. याचा निषेध म्हणून जिल्हातील सर्व शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा तिव्र निषेध केला आहे.
तब्बल 20 वर्षापासून राज्यातील 60200 शिक्षक बिनपगारी काम करत आहे. यातील काही शिक्षकांना 20 टक्के अनुदानीत पगार मिळत आहे. तर काही शिक्षकांना एक रुपयांही पगार मिळत नाही. अनेक शिक्षक हे निवृत्तीच्या उभरंठ्यावर येवून थांबले आहे. तरीही मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना पाझर फुटत नाही. अगदी कँबीनेट मंत्रीमंडळात घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणीसुध्दा शिक्षण मंत्र्यांकडून होत नाही. तब्बल एक वर्षापुर्वी 20 टक्के अनुदानीत शिक्षक जे पगार घेत आहे. त्यांना वाढीव 40 टक्याचा टप्पा मंजूर केला तरी त्याचा निधी वितरणाचा आदेश सरकारने काढलेला नाही. ज्या शिक्षकांना काहीच पगार मिळत नाही असा पात्र शिक्षकांना 20 टक्के पगार देण्याचा कँबीनेट मंत्री मंडळाने निर्णय घेतला आहे.त्याचीही अमलबजावणी नाही. त्यामुळे या शिक्षकांना जे निर्णय झाले त्याप्रमाणे कार्यवाही करावी, प्रचलीत नियमाप्रमाणेशिक्षकांच्या पगारासाठी शासन आदेश काढावा. या मागणीसाठी गेल्या 20 दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करत आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल या शिक्षक संघटनाने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले.

Most Popular

error: Content is protected !!