Friday, May 20, 2022
No menu items!
Homeकोरोनाजलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह, दोन दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस

जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह, दोन दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस

मुंबई -ऑनलाईन रिपोर्टर

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि NCP चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गुरुवारी याविषयी सांगत जयंत पाटलांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

संपर्कात येणाऱ्यांना टेस्ट करण्याचे आवाहन
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.’

दोन दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस
विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 16 फेब्रुवारीला आपला वाढदिवस एका चार्टर्ड प्लेनमध्ये साजरा केला होता. असे म्हटले जात आहे की, या दरम्यान त्यांनी मास्क घातलेला नव्हता.

महाराष्ट्रातील हे नेते राहिले आहेत कोरोना पॉझिटिव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
सहकारमंत्री बाळा साहेब पाटील
सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण
वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अह्वाड
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बंसोड़
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Most Popular

error: Content is protected !!