बीड(रिपोर्टर)- गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसासह गारा पडत आहेत. रात्री बीड जिल्ह्यात वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसाने रब्बी पिकाचे नुकसान झाले. हातातोंडाला आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. काढणीला आलेली ज्वारी त्याचबरोबर गहू, हरभरा, सुर्यफुल, आंब्याचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

परवा औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर विभागात वादळी वार्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. रात्री बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या ज्वारीचे नुकसान झाले. त्याचबरोबर गहू पडला. हरभरा आणि आंब्याचेही नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास निसर्गामुळे हिसकावला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकर्यांची आष्टीत उडाली तारांबळ
अवकाळी पावसामुळे आष्टी तालुक्यातील शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ज्वारी काढणीला आल्यामुळे बहुतांश शेतकर्यांनी ज्वारी काढली मात्र कालपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्यांचे यात मोठे नुकसान झाले. तालुक्यातील ज्वारी , गहू, हरभरा यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.