Monday, March 8, 2021
No menu items!
Home बीड वाळुच्या साठ्यावर तहसीलदारांचा जेसीबीसह 185 ब्रास वाळू केली जप्त

वाळुच्या साठ्यावर तहसीलदारांचा जेसीबीसह 185 ब्रास वाळू केली जप्त

दोन जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नेकनूर (रिपोर्टर)- अवैध वाळू उपसा करणार्‍याविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली. काल तहसीलदारांनी एका वाळू साठ्यावर छापा मारून 185 ब्रास वाळू आणि जेसीबी जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   येळंबघाट शिवारामध्ये वाळुचा साठा असल्याची माहिती तहसीलदार वमणे यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून साठा करून ठेवलेल्या वाळुवर छापा मारला. जवळपास 185 ब्रास वाळू जप्त केली. या वेळी एक जेसीबी ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी मंडल अधिकारी सुरेश भीमराव पाळवदे यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर किशोर काळे, दीपक कांडेकर, संजय राठोड, सचिन डिढोळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेप्रमुख लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

हॉटेल चालकाला मारहाण शिवाजीनगर ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर):- विशाल अशोक गवळी (वय ३२) यांचे चर्‍हाटा रोडवरील आगलावे इस्टेट येथे चहाचे हॉटेल आहे. तेथे एकनाथ कदम व इतर दोघे...