Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडरोहयोतून 214 शेतकर्‍यांनी केली फळबागांची लागवड आंबा, सिताफळाची सर्वाधिक झाली लागवड

रोहयोतून 214 शेतकर्‍यांनी केली फळबागांची लागवड आंबा, सिताफळाची सर्वाधिक झाली लागवड


बीड (रिपोर्टर)- पारंपारिक पिकांची लागवड न करता शेतकर्‍यांनी फळपिकांची लागवड करावी, असे आवाहन सातत्याने केले जाते. मराठवाडा आवर्षणग्रस्त असल्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मारामार असते. अशा दुष्काळी महाराष्ट्रात शेतकरी फळपिके घेऊ लागला. रोहयो योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 214 शेतकर्‍यांनी विविध फळपिकांची लागवड केली. यामध्ये आंबा आणि सिताफळांची सर्वाधिक लागवड झाली आहे.


   गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी पिकांमध्ये बदल केला. पुर्वी पारंपारिक पिकांची लागवड केली जायची मात्र या पारंपारिक पिकातून शेतकर्‍यांना आर्थिक लाभ होता नव्हता. शेतकर्‍यांनी शासकीय योजनेची मदत घेऊन फळबाग लागवड करायला सुरुवात केली. फळबाग लागवड रोहयो योजनेतून केली जाते. बीड जिल्ह्यातील दोनशे चौदा शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये आंबा, पेरू, डाळींब, मोसंबी, कागदी लिंबू, संतरा, सिताफळ, चिंच, चिकू, आवळा, अंजीर या फळपिकांची लागवड केली. सर्वाधिक आंबा 38.75 तर सिताफळ 56.81 हेक्टरमध्ये लागवड करण्यात आले आहे. मराठवाडा हा आवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची मारामार असते, अशा दुष्काळी भागात शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असल्याने मराठ्यात कृषीच्या बाबतीत चेहरा बदलू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे शेतीच्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ झाली असल्याचे दिसून येते. या वर्षी शेतकरी आणखी फळपिकांची लागवड करताना दिसून येऊ लागले आहे.

Most Popular

error: Content is protected !!