Friday, March 5, 2021
No menu items!
Home बीड परळी video-ना धनंजय मुंडे म्हणतात देव करतो ते भल्यासाठीच!

video-ना धनंजय मुंडे म्हणतात देव करतो ते भल्यासाठीच!


बीड (रिपोर्टर)- बीड : जर स्व गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला आमदार केलं असतं तर आज संजय दौण्ड आमदार झाले नसते अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित लोकांना एक गोष्ट सांगितली अन व्यासपीठावर उपस्थित आ संजय दौण्ड यांनी पळतच मुंडे यांना मिठी मारली .मुंडे यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला .परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात मजेदार गोष्ट सांगत सर्वांचे लक्ष वेधून घेतले .


व्यासपीठावर उपस्थित आ गव्हाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी तेव्हा 2009 ला गोपीनाथ मुंडे यांना सांगितले होत की धनंजय मुंडे यांना आमदार करा अन तुमचा वारसदार म्हणून जाहीर करा पण त्यांनी तेव्हा ऐकलं नाही .आ गव्हाणे यांच्या भाषणाचा धागा पकडत मुंडे यांनी एका राजाची अन प्रधानाची गोष्ट सांगितली .
धनंजय मुंडे यांनी सांगितलेली गोष्ट काय?
एक राजा असतो. दरबारात बसल्या बसल्या त्याचं तलवार पुसायचं काम चालू असतं. यावेळी त्याचं थोडं लक्ष विचलित होतं धारदार तलवारीने त्याच्या एका हाताचा  अंगठा तुटतो. तितक्यात शेजारी उभा असलेला प्रधान म्हणतो, राजे देव करतो भल्यासाठीच राजाला राग येतो. राजा आदेश देतो या प्रधानाला काळ्या कोठडीत डांबा प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा होते.
बर्‍याच दिवसांनंतर राजाला हुकी येते की आपण शिकारीला जाऊ राजा शिकारीला निघतो. सोबतीला सोनापती आणखी थोडी फौज दाट जंगलात राजा जातो फौज मागे पडते तिथले आदिमानव राजाला पकडतात. ते त्या राजाला त्यांच्या राजाकडं घेऊन जातात त्यावेळी तिथे नरबळीची प्रक्रिया चालू असते. नेमकं त्याच वेळी त्यांना बरबळी हवा होता आदिमानवांनी त्यांच्या राजाला सांगितलं, आम्ही नरबळी आणलाय.. प्रथेप्रमाणे राजाला अंघोळ घातली गेली. पण अंघोळ घालत असताना एका वृद्ध आदिमानवाच्या लक्षात येतं याला तर अंगठा नाही’ असा नरबळी नको ते पाहिल्यानंतर संबंधित राजा त्या राजाला सोडून देतो

सुटका झालेला राजा पळत पळत आपल्या राजवाड्यात येतो आपल्या सैनिकांना आदेश देतो प्रधानाला सोडा प्रधानाला सोडलं जातं. राजा आपल्या प्रधानाला त्याला मिठी मारतो.. जंगलातला सगळा प्रकार राजा आपल्या प्रधानाला सांगतो त्यावेळी प्रधान पुन्हा एकदा म्हणतो, राजे मी म्हटलं होतं ना तुम्हाला देव करतो तो सगळं भल्यासाठी करतो पण राजे तुम्ही मला जेलमध्ये टाकलं.. ते सुद्धा बरंच केलं.. जर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं तर मी तुमच्यासोबत जंगलामध्ये आलो असतो मी सावलीसारखा तुमच्यासोबत असतो नरबळीवेळी तुमचा अंगठा तुटला म्हणून त्यांनी तुम्हाला सोडलं असतं पण मला धरलं असतं. म्हणून संजय भाऊ देव करतो तो भल्यासाठीच करतो. परळीतील एका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय वारसा कुणाला मिळावा? यावर बहीण पंकजा मुंडे यांचे नाव घेता पुन्हा तोफ डागली. माझ्या आजीने लहानपणी मला ही गोष्ट सांगितलीय असे सांगत मुंडे यांनी राजाची गोष्ट सांगून उपस्थितांकडून दाद मिळवून घेतली

Most Popular

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरात आज आठवडी बाजारात कोरोनाचे गांभीर्य नसणार्‍या दुकानदारांवर तहसीलदार सचीन खाडे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली असून बाजारात झालेली...

अंबेवडगाव जवळ कार-ट्रॅक्टरचा अपघात एक ठार

किल्ले धारूर (रिपोर्टर ) -धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथे पहाटे तिन चे दरम्यान कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या...

दोघांचा मृत्यू, नवे ५७ रुग्ण

बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्युचा दरही कमी व्हायला तयार नाही. काल जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज पुन्हा...