बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शिस्तीचे पालन करण्याच्या सक्तीच्या सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर प्रशासन कामाला लागलं. पोलीसांनी आज सकाळपासून रस्त्यावर उतरत मास्क न वापरणार्या दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली.

दुपारी 12 वाजपेर्यंत जवळपास 180 नागरिकांना दंड देण्यात आला होता. गेल्या काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकार्यांना कोरोनाच्या नियमाबाबत सक्तीच्या सूचना दिल्या. त्यानुसार कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली. मास्क वापरूनच प्रत्येक नागरिकांना घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मास्क न वापरणार्या नागरिकांना दंड दिला जात आहे. आज सकाळपासून शिवाजीनगर वाहतुक शाखा, बीड शहर, पेठ बीडचे पोलीस रस्त्यावर उतरले. मास्क न वापरणार्या दुचाकीस्वारांना अडवत त्यांना दंड देण्यास सुरूवात केली. दुपारी 12 वाजेपर्यंत 180 नागरिकांना दंड देण्यात आलेला होता.