Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडमहिन्याला पंधरा लाख रूपये खर्च, तरीही केज शहरात घाणीचे साम्राज्य

महिन्याला पंधरा लाख रूपये खर्च, तरीही केज शहरात घाणीचे साम्राज्य

केज | सय्यद माजेद
स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ग्रामीण भागासह शहरी भाग स्वच्छ करण्याच्या सूचना असतांना केवळ नगर पंचायत आणि नगर पालिका दिखावूपणा दाखवुन नुसता निधी लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. केजच्या स्वच्छतेसाठी महिन्याला पंधरा लाख रूपये खर्च होतो तरीही शहरामध्ये जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगर पंचायत अंतर्गत जागोजागी कचर्‍याचे ढीग आहेत. रस्त्याची अवस्था वाईटट आहे, नाल्याचा प्रश्‍न प्रलंबित असून नागरी प्रश्‍न सोडवण्याकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष राहत आलेले आहे.

ही नगर पंचायत कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात होती मात्र गेल्या एक वर्षापासून नगर पंचायतचा कार्यकाळ संपल्यामुळे या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला पंधरा लाख रूपये खर्च होते. या खर्चात शहर स्वच्छ व्हायला हवे मात्र शहरात घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्याने स्वच्छतेसाठी आलेला पैसा नेमका जातो कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वित्त आयोगाचा निधीही खर्च केल्याचे दाखवले जाते मात्र त्यातून शहराचा काय विकास झाला? याचा जाब नगर पंचायतला शहरातील जनतेने विचारायला हवा. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान योजना सुरू केली असली तरी अस्वच्छ केज असल्याचे आज तरी दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!