केज (रिपोर्टर):- महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. राज्य सरकारने सतर्कतेचे आदेश देत मास्क वापरण्याची सक्ती केली. जे वाहनधारक आणि नागरिक मास्क वापरणार नाही त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज केज येथे न.प.आणि तहसील प्रशासनाच्या वतीने कारवाईच्या मोहिमेला सुुरूवात झाली. सकाळपासून अनेकावर कारवाई करण्यात आली.
मध्यंतरी कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढु लागले. नागरिक कोरोना बाबत काळजी घेत नाहीत, दक्षता पाळत नाही, त्यामुळे कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. प्रशासनाला ही सक्त सूचना बजावण्यात आल्या. त्यानुसार प्रशासनाने मास्क न वापरणार्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली. आज नगर पालिका आणि तहसीलदार यांनी मास्क न वापरणार्या विरोधात कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली. यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडगे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, मुख्याधिकारी हजारे यांच्या आदेशानुसार कर्मचारी सय्यद अन्वर, कुरेशी रफिक, भिमा हजारे, दादा मस्के, जगतापसह आदी कर्मचार्यांनी दुपारपर्यंत अनेकावर दंडात्मक कारवाई केली होती.