गेवराई – गेवराईमध्ये मास्क न वापरणार्या दुचाकीस्वाराविरोधात पोलीस प्रशासन व नगर पालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई केली जावू लागली. दुपारपर्यंत सहा हजार रूपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगल कार्यालयाला नोटीसा बजावण्यात आल्या असून पन्नास पेक्षा जास्त लोक आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी ढाकणे यांनी दिला. कारवाईची मोहिम संदिप काळे, पोद्दार, गायकवाड, सरवदे या पोलीस कर्मचार्यासह न.प.चे कर्मचारी येवले, वडमारे, कैलास सुतार, राम सुतार, दिपक वडमारे, पौळ यांनी सुरू केली आहे.