बीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा आरोग्य विभागाला जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश मिळाल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून चाचण्या वाढल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे. आज आलेल्या अहवालात अंबाजोगाईत १९ तर बीड तालुक्यात १६ रुग्ण आढळून आल्याने पुन्हा कोरोनाने मुसंडी मारली असून लस आली असली तरी मास्क वापरणे गरजेचे आहे.
आरोग्य विभागाला आज ४१९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालात ५३ पॉझिटिव्ह आले असून ३६६ जण निगेटिव्ह आले आहेत. त्यात अंबाजोगाई आणि बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले असून आष्टी १, धारूर १, केज ३, गेवराई १, परळी ५, पाटोदा १ तर शिरूर तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमात
सोशल डिस्टन्सचा फज्जा
कालपासून विनामास्क टूव्हीलरवर फिरणार्यांना वाहतूक शाखा आणि नगरपालिकेच्या वतीने दंड आकारण्यात आला मात्र दुसरीकडे सार्वजनिक कार्यक्रमात विना मास्क सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून याच कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यात संसर्ग वाढत असून अशा सार्वजनिक कार्यक्रमांकडे जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.