Friday, May 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- ‘अनलॉक’ महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?

अग्रलेख- ‘अनलॉक’ महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?

गणेश सावंत
मो. न. ९४२२७४२८१०

२०२० मध्ये उच्छाद् मांडलेल्या कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात मोठे प्रयत्न झाले. अखंड भारतात कोरोनाच्या मुसक्या आवळण्यासाठी घरबंद होत लोकांनी अनेक महिने काढले. उद्योग धंदे बंद ठेवले. सर्वसामान्यांच्या हातचा रोजगार गेला. देशाच्या अर्थव्यवस्थेसह र्सासामान्यातील सर्वसामान्य माणसाच्या घरातील अर्थव्यवस्था आज अक्षरश: ढेपाळून गेली. आरोग्य व्यवस्था कोलमडली, ज्ञानार्जन करणार्‍या विद्यार्थ्यांना घरीच विद्येचं मंदिर स्थापन करावं लागलं. २०२० चे साल कोरोनाच्या मदमस्तीचे राहिले. शेवटच्या दोन महिन्यात कोरोना आटोक्यात येतोय, अन् २०२१ च्या जानेवारीत कोरोना संपुष्टात आलाय, या भाबड्या आशावादाने देशातील जनता बेफिकीर झाली. खरं पाहिलं तर २०२० च्या सालात उच्छाद् मांडलेल्या कोरोनाने उभ्या जगाला बरच काही शिकवलं. परंतु पुढचं पाठ, मागचं सपाट या भूमिकेत असलेल्या तुम्हा-आम्हाला इतिहासाची आठवण तेव्हाच येते जेव्हा पाणी नाका-तोंडात पोहचते. आताही तेच होतय. सुरुवातीपासून कोरेानासोबत लढण्याचे शस्त्र हे सोशल डिस्टंन्सिंग आणि तोंडावरचे मास्क असल्याचे शासन-प्रशासन ओरडून सांगत होते.

मात्र कोरोना निपचित पडलाय या भंपक विश्वासाने जो तो बेफिकीर झाला, बेशिस्त झाला अन् पुन्हा महाराष्ट्रात कोरोना थयथयाट करण्याच्या इरादे बाहेर पडला. या बेफिकीरीला आणि बेशिस्तीला जबाबदार कोण? हा प्रश्‍न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा प्रत्येकाला आत्मचिंतन करण्याची वेळ येते, शासन-प्रशासन व्यवस्थेबरोबर सर्वसामान्य नागरिकांनीही कोरोनाकडे दुर्लक्ष करत
कोरोनाला निपचित


करण्याचे शस्त्र
देशाने निर्माण केले. हे अभिमानाने आणि मोठेपणाने सांगितले जाऊ लागले. नक्कीच भारताने कोरोनावरच्या दोन ते तीन लस निर्माण केल्या. देशभरात लसीकरणही सुरू झाले, परंतु एक कोरोना रुग्ण बाधित ३० ते ३५ जणांना बाधीत करू शकतो ही वस्तूस्थिती असल्याने आणि अजाग्र असलेल्या १३० कोटी लोकसंख्येच्या देशात कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी महिनो नव्हे तर वर्ष दोन वर्ष लागणार असल्याने लस आली की, कोरोना संपुष्टात आला, या वाक्यप्रयोगाला, आत्मविश्वासाला बेफिकीरीची आणि बेशिस्तीची जोड लावणे मुर्खपणाचे ठरेल म्हणण्यापेक्षा ठरले. मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरात गेल्या पाच दिवसांच्या कालखंडामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. सुरुवातीला जेव्हा कोरोना देशात आला, महाराष्ट्रात पोहचला तेव्हा एक दोन बाधीत असलेल्या जिल्ह्यांनी प्रचंड काळजी घेतली. शंभर टक्के लॉकडाऊन केले, लोक घरात बसून राहिले तरीही एक-दोन बाधीत असलेल्या जिल्ह्यांचा आकडा अवघ्या काही दिवसात आणि महिन्यात शेकड्यावर-हजारावर जावून पोहचला हे उघड सत्य समोर असताना ज्या वेळेस कोरोना कमी होत आहे, हे लक्षात आले तेव्हाही सर्वसामान्यांनी आणि प्रशासनाने सुरुवातीला जे गांभीर्य घेतले होते तेच गांभीर्य सातत्याने ठेवले असते तर आज


पुन्हा लॉकडाऊन
ची वेळ आपल्यावर येऊन ठेपली नसती. पुन्हा लॉकडाऊनची आवई, चर्चा, अफवा उठण्याचेही कारण नव्हते. परंतु लस आली आता कोरोना काहीच करू शकत नाही हा जो फाजिल विश्‍वास सर्वसामान्यांसह प्रशासन व्यवस्थेमध्ये दृढ करून राहिला त्यानंतर गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात महाराष्ट्रात कोरोना बाबतचे नियम पुर्णत: पायदळी तुडवण्यात आले. अनेक राजकीय कार्यक्रम तेवढ्याच दणक्यात झाले, आमदार-खासदार, पुढार्‍यांच्या घरच्या लग्न कार्यांना जत्रेचे स्वरुप आले. यथा राजा तथा प्रजा असे आपल्याकडे म्हटले जाते. जे लोक मार्गदर्शक असतात, सूचक असतात या लोकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष करून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवून धार्मिक, राजकीय, सामाजिक वैयक्तिक कार्यक्रम दणक्यात साजरे केले आणि इथेच


दगा-फटका
झाला. फाजील आत्मविश्वास सर्वसामन्यांसह प्रशासन व्यवस्थेत काम करणार्‍या अधिकारी, कर्मचारी यांना नडला आणि पुन्हा लॉकडाऊन हाच पर्याय उरल्याचा सूर सर्वत्र निघू लागला. कोरोनाने दगफटका केला खरा, या दगा फटक्याला कारणीभूत कोण? हा प्रश्‍न विचारण्यापेक्षा पुन्हा महाराष्ट्राच्या माथी लॉकडाऊन लावण्यास जबाबदार कोण? हा प्रश्‍न नक्कीच उपस्थित करावा लागेल. कोरोनाने गेलं वर्ष अक्षरश: घरात बसून ठेवणारं राहिलं. त्या वर्षात घर चालवण्यासाठी खर्च तर करावा लागला, परंतु उत्पन्न काहीच नव्हतं. या स्थितीत आता कुठं अनलॉक महाराष्ट्रात दैनंदिन जीवन पुर्वपदावर येऊ पाहत आहे, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत तेही रोजंदारीवर कुठे काम करून दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत

पुन्हा लॉकडाऊन
होणं म्हणजे सर्वसामान्य माणसांसह छोटे-मोठे व्यापारी, कष्टकरी, कामगार यांचा आर्थिकदृष्ट्या गळा दाबणेच होय. आज मितीला लॉकडाऊनचे समर्थन कोणीच करणार नाही, परंतु लॉकडाऊन केले तर आर्थिकदृष्ट्या दुबळी होणारी माणसे सरणावर जातील आणि हाच बेशिस्तपणा आणि बेफिकीरी राहिली तर कोरोनाने माणसे मसनवाट्यात जातील. अशा दुधारी तलवारीच्या खाली बसलेल्या माणसांना आजमितीला काय करावे ते कळत नाही. परंतु या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सोशल डिस्टन्ससह मास्क लावणे, गरज असणार्‍यांनीच घराबाहेर पडणे. राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम अत्यंत कमी माणसांमध्ये घेणे हा त्याच्यावर पर्याय असणार आहे. पुन्हा लॉकडाऊन हा यावर एकमेव उपाय असल्याचे ब्रिदच आपल्याकडे झाले. परंतु कोरोनाला हद्दपार केवळ लॉकडाऊनमुळेच करता येतं हेही ठामपणे कोणाला सांगता येत नाही. या स्थितीत कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येक माणसाने ही लढाई माझी आहे असे समजून प्रत्येक दिवसाला सामोरे गेले तर आणि तरच कोरोनापासून सुटका मिळू शकेल.

Most Popular

error: Content is protected !!