माजलगाव (रिपोर्टर)- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघे तरुण मित्र जागीच ठार झाले तर अन्य एक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.सदरचा अपघात माजलगाव – गेवराई रोडवर घडला .या अपघातात मोटारसायकलचा चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले .
रविराज शेंडगे आणि विवेक मायकर व अन्य एकजण रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून माजलगाव वरून केसापुरी कॅम्प कडे निघाले होते .रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या ट्रॉलीला मोटार सायकलची जोराची धडक झाली .रविराज रामहरी शेंडगे (वय २०) रा.उमरी तर विवेक भागवत मायकर (वय२१) पिंपळगाव (नाकले) या दोन तरुणांचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर तिसरा ओंकार काळे हा तरुण जखमी आसुन त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार साठी दाखल केले आहे.