बीड (रिपोर्टर):- शेतामध्ये ठेवलेला चार ते पाच क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही घटना तालुक्यातील कामखेडा येथे घडली आहे.
शेख सिराज यांनी वेचलेला कापूस शेतातील गोठ्यात गोण्यात भरून ठेवला होता. अज्ञात चोरट्याने संधी साधून चार ते पाच क्विंटल कापूस चोरून नेला व इतर कापूस अस्तव्यस्तपणे शेतामध्ये टाकला. हा चोरीचा प्रकार सिराज यांना सकाळी निदर्शनास आला.