बीड (रिपोर्टर)- काल बीड जिल्ह्यातून ४३१ संशयितांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये ३९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर ३९२ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आजही अंबाजोगाई अणि बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामध्ये शिरूर ३, परळी २, केज ३, गेवराई १, धारूर १, बीड १२ आणि अंबाजोगाई तालुक्यात १७ रुग्ण आढळून आले आहेत.