Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमविद्यार्थ्यांना आलेल्या तांदाळाच्या मापात पाप

विद्यार्थ्यांना आलेल्या तांदाळाच्या मापात पाप

५० किलो तांदळाचा कट्टा भरला ४५ किलोचा; शिरूर जि. प.शाळेच्या समितीने केला पर्दाफाश
शिरूर (रिपोर्टर):- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शालेय पोषण आहाराच्या मापात पाप होत असल्याचे आज शिरूर जिल्हा परिषद शाळेत उघड झाले. विद्यार्थ्यांसाठी येणार्‍या तांदळाच्या ५० किलोच्या पोत्यामागे तब्बल ५ किलो तांदुळ कमी भरल्यानंतर उपस्थित शालेय शिक्षण समितीने उपस्थित टेम्पो चालकाकडून पुर्ण तांदुळ वजन काट्यावर मोजुन घेतला. हा तांदुळ मोजला नसता तर संबंधित शाळेला दोन ते अडीच क्विंटल तांदुळ कमी आला असता. साई ट्रेडींग कंपनीला तांदुळ वाटपाचे टेंडर देण्यात आलेले आहे. एका शाळेत दोन ते तीन क्विंटल तांदुळ कमी जात असेल तर जिल्ह्यातील अन्य शाळांची गणना केली असता किती क्विंटल तांदळाचा घपला होत असेल? याप्रकरणी शिक्षण विभागाने गांभीर्याने घेत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या निमित्ताने तादंळाचे वाटप केले जाते. साई ट्रेडींग कंपनी मार्फत हा तांदुळ दिला जातो. आज शिरूर जिल्हा परिषद शाळेमध्ये तांदुळ देण्यासाठी ट्रेडींग कंपनीचा टेम्पो आला. यावेळी शालेय शिक्षण समितीने तांदुळ मोजुण घेण्याचे ठरवले. गेल्या महिन्यात शालेय शिक्षण समितीला तीन क्विंटलपेक्षा जास्त तांदुळ विद्यार्थ्यांना देण्यासाठी कमी पडला होता. त्यामुळे त्यांना शंका आली आणि त्यांनी आज तांदळाच्या पोत्याचे वजन करण्याचे ठरवले. यावेळी कंपनीचा व्यक्ती तांदुळ मोजून देण्यास तयार नव्हता. मात्र शालेय शिक्षण समितीसह शिक्षक आणि उपस्थित लोकांनी तांदुळ मोजुन दिला तरच आम्ही तो स्विकारू अशी भूमिका घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीने तांदुळ मोजून देण्याचे मान्य केले. प्रत्येक्षात जेंव्हा तांदुळ मोजण्यात येवू लागला तेंव्हा ५० किलो वजनाच्या तांदळाच्या पोत्यामागे तब्बल ४ ते ५ किलो तांदुळ कमी असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्याच्या उपस्थितीवर तांदुळ हा संबंधित शाळेला दिला जातो. आज ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेला तांदुळ देण्यात आला तो २५ क्विंटल एवढा होता. प्रत्येक तांदळाच्या पोत्यामागे चार ते पाच किलो तांदुळ कमी भरला. तेंव्हा या शाळेला अडीच क्विंटलपेक्षा जास्त तांदुळ कमी आला असता. येथील शालेय समितीने तांदुळ मोजून घेतला म्हणून सदरचा प्रकार उघडकीस आला. अन्य शाळात दिल्या जाणार्‍या तांदळाच्या मापातही पाप होत असल्याने विद्यार्थ्यांचा तोंडचा घास पळवण्यात येत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या अन्य दाळीदुळीसह साहित्यातही मोठा घपला केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!