बीड (रिपोर्टर) बिंदू नामावली वेगळी झाल्यामुळे उर्दू माध्यमाची सेवा जेष्ठ यादी वेगळी तयार करून पदोन्नती देण्यात यावी व दर्जावाढ देताना बी.एड पधवीधाराकांना प्राधान्य देऊन दर्जावाढ देण्यात यावे तसेच मुख्याध्यापक ऊर्दु सेवा जेष्ठता यादी प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, जिल्ह्यात रिक्त प्राथमिक पदवीधर व मुख्याध्यापक पदे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनाच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे केली असता त्यांनी दोन दिवसात मिटिंग लावुन निर्णय घेण्याचे मान्य केले. यावेळी संघटनेचे काझी मुशाहेद, मोमीन अब्दुल करीम, मोमीन अलीम शेख इरशान, काझी अब्दुल माजेद, शेख इम्रान, शेख माजेद, खातीब एम. झेड, मिर्झा अजमत, सय्यद रिजवान आदी पदअधिकारी उपस्थित होते.