Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमबनावट पीयुसी देणार्‍यांवर ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

बनावट पीयुसी देणार्‍यांवर ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर):- बनावट पीयुसी देवून चालकासह शासनाची फसवणुक करणार्‍याविरोधात वाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांनी बीड ग्रामीण पोलीसात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख शहेबाज शेख समीयोद्दीन हे आरटीओ ऑफिसजवळ नॅशनल पीयुसी सेंटर अँड मल्टीसर्व्हीस टाकून त्याद्वारे बनावट पियुसी वाहन चालकांना देत होते. दि.21 रोजी नॅशनल पियुसी सेंटर येथून त्यांनी वाहन क्र.एम.एच.12 एफसी 4422 या वाहनास बनावट पीयुसी देवून मा.उच्च न्यायालयाचे व न्यायालयाचे अटी शर्तीचे पालन न करता पीयुसी प्रमाणपत्र देवून ते खरे असल्याचे भासून फसवणुक केली म्हणून त्याच्याविरोधात ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ह.सातपुते हे करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!