Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडधार्मिक विकासाच्या नावाखाली अनाधिकृत बांधकाम करणे चुकीचे-शेख वकील

धार्मिक विकासाच्या नावाखाली अनाधिकृत बांधकाम करणे चुकीचे-शेख वकील

बीड (रिपोर्टर):- बीड नगर पालिकनेे दि.9.7.2020 मध्ये नुसरत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड यांना खॉनखा (भक्ती निवास)साठी 1840 चौ.मी. जागा सर्व्हे नं.27 बलगुजरमध्ये ओपन स्पेसची खुली जागा दिलेली आहे. बीड नगर परिषदेने खुली जागा देत असतांना यामध्ये 184 चौ.मी. जागेमध्ये बांधकाम करण्यास मंजुरी दिलेली आहे. परंतू तुम्ही बांधकाम करत असतांना दिलेल्या जागेपेक्षा 4000 चौ.मी. वर बांधकाम सुरू केलेले आहे. जे की अत्यंत चुकीचे व अनाधिकृत आहे.
सर्व्हे नं.27 मध्ये माझी स्वत:ची शाळा आहे, शाळा सुरू करत असतांना सदर ओपन स्पेसमधील खुली जागा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान म्हणून वापरण्यासाठी याठिकाणी शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत सर्वसामान्य माणसांची आणि सामाजाची मुलेच शिक्षण घेतात. येथील विद्यार्थ्यांनाच या ओपन स्पेसच्या खुल्या जागेचा फायदा होणार असतांना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नुसरत अली या संस्थेला न.प.बीड ने ओपन स्पेसची जागा दिल्यानंतर सदर संस्थेने 184 चौ.मी.वर बांधकाम करायला पाहिजे होते परंतू असे न करता सदर संस्थेने 4000 चौ.मी.वर बांधकाम केल्याने या विरूद्ध माझी तक्रार आहे. कोणताही समाज सामाजिक किंवा धार्मिक काम करत असतांना अनाधिकृत कामास कायदेशीर आणि धार्मिक मान्यता नसते त्या करिता धार्मिक विकासाच्या नावाखाली अनाधिकृत बांधकाम करू नये यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. समाजाच्या ठेकेदाराला वाटत असेल मी याचिका दाखल करून चुक केली आहे तर मी माझी याचिका परत घेतो परंतू तुम्ही सुद्धा अनाधिकृत बांधकाम केलेले आहे हे मान्य करा. याहीपेक्षा माझ्याकडे बोलण्यासारखे खुप आहे परंतु सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बोलण्यास बंधने आहे. माझ्या या प्रकरणात कोणत्याच नेत्याचा काही संबंध नाही. जर या प्रकरणामध्ये मला राजकारण करायचे असते किंवा नेते मंडळीची मदत घ्यायची असती तर मी गटनेते फारूक पटेल यांच्या विरूद्ध अपात्रतेची कार्यवाहीची तक्रार केली असती. मी कोणत्याही नेत्याचा लाभार्थी नसून त्यासाठी यापुढे तुम्ही माझ्याबरोबर राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर गटनेते फारूक पटेल यांच्यावर तर अपात्रतेची कार्यवाही करण्यास प्रशासनाला भाग पाडू आणि तशी तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे देवू असा इशाराला यावेळी शेख वकील यांनी दिला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!