Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी नगर पंचायत मतदार यादीवर 2 हजाराच्यावर आक्षेप उद्याच्या अंतिम सुनावणीकडे सर्वांचे...

आष्टी नगर पंचायत मतदार यादीवर 2 हजाराच्यावर आक्षेप उद्याच्या अंतिम सुनावणीकडे सर्वांचे लक्ष


आष्टी (रिपोर्टर):- नगर पंचायत निवडणुकीसाठी होत असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानानुसार आष्टी नगर पंचायतची मतदार यादी दि .15 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यावर 22 तारखेपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते.या यादीवर अक्षरश: आक्षेपाचा ढिगच लागला आहे.2 हजार 285 आक्षेप अर्ज दाखल झाले आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आष्टी नगरपंचायत निवडणुक सहा महिने पुढे ढकलण्यात आली नगरपंचायतचा कारभार सध्या प्रशासक पाहत आहे.ही मुदत संपत आली असून पुढील महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. नगरपंचायतचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.त्यादृष्टीने 10 नोव्हेंबर 2020 रोजी प्रभाग रचना व 15 फेब्रुवारी रोजी मतदार यादी जाहीर केली.या यादीवर हरकती मागवण्यात आल्या 7 दिवसात आक्षेपांचा ढिग लागला असुन 2 हजार 285 आक्षेपाची नोंद झाली आहे . त्या आक्षेपांवर दि .23 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर ही सुनावणी उद्या 25 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.सदरील आक्षेपावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!