Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडडिसीसीच्या अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून रविंद्र दळवी बिनविरोध

डिसीसीच्या अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून रविंद्र दळवी बिनविरोध

बीड (रिपोर्टर):- जिल्हा मध्यवर्ती बॅक निवडणूकीत सेवा संस्थेत 87 उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातही 19 पैकी 18 उमेदवार अपात्र असल्याने एकमेव काँग्रेस नेते रविंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज राहिला आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत बिनविरोध आले आहेत.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत उपविधीमुळे सेवा संस्था मतदार संघातील 87 उमेदवारी अर्ज बाद झाल्याने खळबळ उडालेली असतांनाच अनुसूचित जाती जमाती मतदार संघातही 19 पैकी 18 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. केवळ काँग्रेस नेते रविंद्र दळवी यांचा उमेदवार अर्ज राहिला. सध्या ते बिनविरोध आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. बाद उमेदवारांसाठी तीन दिवसाचा कालावधी हा अपीलासाठी असतो.

Most Popular

error: Content is protected !!