Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडडिसीसीसाठी विश्‍वास देशमुख ठरले टीएनशेषन

डिसीसीसाठी विश्‍वास देशमुख ठरले टीएनशेषन

गळ्यात गळे घालणार्‍या सत्ताधारी विरोधकांना देशमुखांचा झपका
अपात्र उमेदवारांची न्यायालयात जाण्यासाठी धावाधाव, आठ जागांसाठी आता मतदान होणार
बीड । रिपोर्टर
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीमुळे सेवासंस्थेमधील सर्वची सर्व 87 उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उमेदवारात प्रचंड खळबळ उडाली असून निवडणूक लढवता यावी यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्या न्यायालयात धाव घेण्यासाठी पळापळ करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डीडीआर विश्‍वास देशमुख हे काम पाहत असून त्यांनी बँकेच्या उपविधीनियमावर कडेकोट बोट ठेवून निवडणूक लढवतांना एकमेकांना सहकार्य करणार्‍या उमेदवारांना काल जबरदस्त दणका दिला. त्यामुळे बीडच्या डीसीसीसाठी विश्‍वास देशमुख खर्‍या अर्थाने टी.एन. शेषन ठरले. 19 जागासाठी होणार्‍या निवडणूकीतील 11 जागांचे उमेदवारी अर्जच उडाल्याने आता आठ जागासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी तब्बल 214 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर काल छाननीच्या वेळेस सेवा संस्था मतदार संघात ज्या 11 जागांसाठी 87 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ते सर्व उमेदवार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आदर्श उपविधी नुसार अ किंवा ब लेखापरिक्षण नसलेल्या संस्थेचे सदस्य आहेत. बँकेच्या उपविधीनुसार ज्या सेवासंस्थेचे लेखापरीक्षण अ किंवा ब वर्गाचे आहे असेच सदस्य यामध्ये निवडणूक लढवू शकतात. या आधी अनेकवेळा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून निवडणूक लढवत असायचे, कोणीही कोणावर आक्षेप घेत नसे, सम्यारम्याने बँकेत जावून बसायचे, यावेळी मात्र निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे विश्‍वास देशमुख यांनी काम पाहिले ते अत्यंत ताठरतेने आणि नियमावर बोट ठेवून त्यांनी ते काम पार पाडले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपविधीत जे सांगण्यात आले, जो नियम आहे ते नियम काटेकोरपणे पाळून विश्‍वास देशमुख यांनी इतिहासात प्रथमच सर्वची सर्व उमेदवारांना बाद ठरवण्यात आले. याआधी देशाचे निवडणूक आयूक्त म्हणून टी.एन. शेषन यांनी अत्यंत ताठरतेने कामकाज केले होते. आचारसंहिता काय असते हे त्यांनी उभ्या देशाला दाखून दिले होते. त्या पद्धतीनेच विश्‍वास देशमुखांनी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत काम करून बीडच्या डीसीसीसाठी विश्‍वास देशमुख ठरले टी.एन. शेषन असे म्हणण्याची वेळ सर्वांवर आणून ठेवली. निवडणूकीमध्ये अपात्र झालेले सर्वची सर्व उमेदवार मग ते भाजप, राष्ट्रवादी, काँग्रस या अन्य कुठल्याही पक्षाचे असो त्यांनी आता न्यायालयात धाव घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तीन दिवसाचा कालावधी न्यायलयात जाण्यासाठी असल्याने 87 अर्ज दाखल करणारे बहुतांशी मातब्बर हे वकीलांच्या दारात दिसून येत आहेत. बीडच्या मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचाराच्या आरोपात असलेले काही अपात्र अशा लोकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतू विश्‍वास देशमुख यांनी ही ताठर भुमिका घेवून नियमाला महत्त्व दिले. आता 19 पैकी 11 जागांवर उमेदवाराअभावी निवडणूक होण्याचे चिन्ह दिसून येत नाहीत. 8 जागांसाठी प्रक्रिया संस्था, इतर शेती संस्था, पतसंस्था, नागरी बँक, महिला, अनुसूचित जाती जमाती इतर मार्गवर्सीय मतदार संघासाठी निवडणूका होणार आहेत.

बँकेच्या प्रशासनाला उपविधी आवश्यक वाटत होत्या-देशमुख
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आदर्श उपविधीमुळे 87 उमेदवारी अर्ज बाद झाले. बँक प्रशासनाने ठराव घेतल्यानंतरही आदर्श उपविधीत दुरूस्ती केली नाही. विशेष म्हणजे त्यांना ही दुरूस्ती करण्यासाठी पाच वर्षाचा कालखंड होता परंतू प्रशासनाकडून उपविधी दुरूस्ती झाली नसल्याने प्रशासनालाच उपविधी आवश्य वाटत होत्या. माझ्या ऑर्डरमध्ये मी तसे मेन्शन केले आहे. त्यामुळे मला हा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आता यामध्ये कायदेशीर लढाई लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्यापासून पुढे तो उच्च न्यायालयापर्यंत हा विषय जावू शकतो. परंतू उपविधीला धक्का लागेल असं मला तरी वाटत नाही. कारण संस्थेने मंजूर केलेली उपविधी आहे ती, उच्च न्यायालयही यामध्ये हस्तक्षेप करेल असं मला वाटत नाही. आता पुढे काय समोर येते त्यावर अवलंबून आहे असं म्हणत निवडणुक निर्णय अधिकारी विश्‍वास देशमुख यांनी कालच्या सर्व निर्णय प्रक्रीयेवर भाष्य केले.

बँकेच्या ढिसाळ प्रशासनामुळे ही वेळ
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासन अत्यंत ढिसाळ आणि कामचुकार असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. जिल्हा बँकेची आदर्श उपविधी दुरूस्त करण्यात यावी यासाठी गेल्या पाच वर्षापूर्वीच महत्त्वाचा ठराव झाला परंतू हा ठराव झाल्यानंतर बँकेच्या प्रशासन व्यवस्थेने ज्या पद्धतीने हालचाली करून हा ठराव डीडीआर, विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडे पाठवायला हवा होता तो त्यांनी पाठवला नाही त्यामुळे आज 87 उमेदवारी अर्ज बाद झाले आणि बँकेवर केवळ 8 जागासाठी निवडणूक घेण्याची वेळ आली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!